दगडूशेठ हलवाई गणपती हे म्हणजे पुणेकरांचा लाडका बाप्पा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मानाच्या पाच गणपतींमध्ये या गणपतीचा समावेश होत नाही. तरीही या गणपतीचं विशेष महत्त्व आहे. त्याची बैठक, त्याचा मुकुट, त्याचे अलंकार त्याचं रुप सगळं काही लोभस आहे. त्याचमुळे पुणेकरांचे पाय या मंदिराकडे आपोआप वळतात. गणेशोत्सवात या गणपतीच्या दर्शनालाही सगळ्यांचीच गर्दी होते.

दगडूशेठ हलवाई गणपतीचा थोडक्यात इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठ भागात असलेले दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहण्याची इमारत होती. त्याकाळी पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या दोघांना दुःख झालं. याच काळात त्यांचे गुरु माधवनाथ महाराज यांनी त्यांचे सांत्वन केले आणि सांगितले की आपण काही काळजी करु नका एक दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करा वर त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवतं आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. अशा रितीने तयार झाली ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. १८९६ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव होऊ लागला. याच काळात दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. पण त्यांनी सुरु केलेली गणेशोत्सवाची परंपरा कायम राहिली. १९६७ मध्ये पुन्हा एकदा नवी मूर्ती तयार करण्यात आली.