पुणे : गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील २७१ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या २७१ नवीन रुग्णांपैकी १५२ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आहेत. ६१ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर ५८ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. गुरुवारी पुणे महापालिका क्षेत्रात करोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी आढळलेल्या २७१ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ९३ हजार १६० एवढी झाली आहे. जिल्ह्यातील १६१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune district logs new 271 covid 19 cases pune print news zws
First published on: 18-08-2022 at 22:33 IST