पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणार्‍या एक ७२ वर्षीय आजोबांनी पोपटाच्या सततच्या शिट्ट्यामुळे होणार्‍या त्रासाला वैतागून थेट पोलीस स्टेशन गाठल्याचे समोर आले आहे. या आजोबांनी थेट खडकी पोलिस स्टेशन गाठत, पोपट पाळणार्‍या व्यक्ती विरोधात तक्रार केली आहे. तर या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील महात्मा गांधी वसाहतीमध्ये राहणार्‍या ७२ वर्षीय आजोबांच्या घरासमोर एक व्यक्ती पोपट पाळतो. मात्र तो पोपट सतत शिट्ट्या मारत असतो. यामुळेच आजोबांना खूप त्रास होतो. त्यावर त्या आजोबांनी तो पोपट कुठे तरी ठेवून द्या, असे संबधित व्यक्तीला सांगितले. पण त्याने वाद घालण्यास सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सततच्या त्रासाला वैतागून अखेर आजोबांनी खडकी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा केला आहे. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबधित पोपट पाळणार्‍या व्यक्तीला खडकी पोलिसांनी बोलून घेत, कोणत्याही प्रकाराचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणयाची समज दिली आहे.