मित्राने पत्नीसोबत गैरवर्तन केल्याने पतीने त्याचा खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील म्हाळुंगे येथे घडली आहे. या प्रकरणी महेश उर्फ बंटी जयवंत येळवंडे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तर, प्रवीण रामदास गवारी अस खून झालेल्या मित्राचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश आणि मयत प्रवीण दोघे मित्र होते. प्रवीणची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे प्रविण तणावात होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मयत प्रवीण महेशच्या घरी आला, तेव्हा महेशची पत्नी चार वर्षीय मुलाला दूध पाजत होती. मयत प्रवीण हा त्याच्या जवळ येऊन बसला आणि बंटी कुठे आहे असे विचारायला लागला. महेशच्या पत्नीने सासूला आवाज देऊन बोलवून घेतले मग तो तिथून निघून गेला.

संपूर्ण घडलेला प्रकार पत्नीने महेशाला सांगितला. महेशने प्रवीणच्या भावाला फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. मात्र, तुम्ही दोघे पाहून घ्या असे त्याने म्हटले. पत्नीसोबत गैरवर्तन केल्याने महेशला राग अनावर झाला होता. त्याने दारू पिण्याच्या बहाण्याने प्रवीणला बोलावले. त्यावेळी इतर दोन मित्र ही त्या ठिकाणी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दारू प्यायल्यानंतर घडलेल्या घटनेवरून दोघांमध्ये वाद झाला आणि महेशने मित्राच्या मदतीने काठीने डोक्यावर मारहाण करून प्रवीणचा खून केला. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी आरोपी महेशला अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करत आहेत.