पुणे : कोंढवा भागातील एकाच सोसायटीतील दोन सदनिका आणि स्वारगेट येथील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढव्यातील खडी मशिन चौकातील उत्सव हाउसिंग सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५२ हजारांची रोकड, तसेच शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून २५ हजारांची राेकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्वारगेट भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत.