पुण्यात महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’ या वक्तव्यावर आक्षेप घेत आंदोलन केलं. महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी आणि पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूजा आनंद यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात भाषणा दरम्यान मोदींकडून झालेल्या या उच्चाराचा निषेध करण्यात आला.

संगीता तिवारी यांनी म्हटलं, “इकोनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे व्यक्तव्य केले आहे. पंतप्रधान ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’ अशी बेताल वक्तव्य कधीपासून करायला लागले? यांच्या मनात जे तेच ओठावर आले. भाजपाचे आमदार राम कदम पोरी पळवण्याची भाषा करतात आणि पंतप्रधान पोरी पटवण्याचं वक्तव्य करत आहेत.”

“आमच्या मुली पटवायला त्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत”

“आम्ही महिला काँग्रेस आणि पुण्याच्या महिला, मातृशक्ती मोदींना फिरणे कठीण करू. मोदींनी आमच्या मुली पटवायला त्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत. आम्ही मोदींचा निषेध करतो. तुम्ही आमच्या महिलांना, मुलींना कमकुवत समजू नका. आमच्या मुली आदिशक्ती आहेत. मुलींचा आदर करा, नाही तर खुर्ची खाली करा,” असंही मत महिला काँग्रेसने मांडलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनात बेटी के सम्मान में बेटियां उत्तरी मैदान में अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच मोदींच्या पुतळ्याला चप्पल मारत निषेध करण्यात आला. यावेळी महिला अध्यक्ष पूजा आनंद, शहर अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र उपाध्यक्ष संगीता तिवारी दीप्ति चौधरी, नगरसेवक अरविंद शिंदे, अभय छाजेड, विरेंद्र किराड, सुजाता शेट्टी, रजनी त्रिभुवन, नानी राजगुरु, रफीक शेख, सुजाता चिंता, सुनीता नेमुर, शोभा पन्नीकर, अंजली सोलपुरे इत्यादी उपस्थित होते.