पुण्यातील बिबवेवाडी भागात सराईत गुंडास चौघांनी रंग लावला. त्यावरून झालेल्या वादातून या गुंडावर चाकू आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात गुंडाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. योगेश रामचंद्र पवार वय २१ असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. विश्वास शिंदे,नागेश फुलारे,सनी भोडेकर आणि ओंकार खाटपे अशी आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास योगेश पवार हा दुचाकीवरून जात होता. तेव्हा तिथे विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनी भोडेकर आणि ओंकार खाटपे रंग खेळत होते. तेवढ्यात या चौघांपैकी एकाने योगेश पवार याच्यावर रंग फेकला. योगेश याने पुढे जाऊन दुचाकी बाजूला घेतली आणि माझ्यावर रंग का फेकला असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर विश्वास शिंदे, नागेश फुलारे,सनी भोडेकर आणि ओंकार खाटपे यांनी बाजूला असलेल्या सिमेंटच्या पाईपमधून चाकू आणि कोयत्याने योगेश पवार याच्यावर वार करण्यास सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


यामध्ये योगेश पवार हा रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडून राहिला. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.तर या घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले.