पुणे: लग्नाचं आमिष दाखवून नातेवाईकानेच केला बलात्कार; अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर

मुलीला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात दाखल केलं. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुण्यातील १४ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला गर्भवती केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २० वर्षीय आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. आसिफ नासिर शेख वय २० रा.गुजरात, असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आणि पीडित मुलगी हे नातेवाईक आहेत. आरोपीने पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून १५ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर काही दिवसांनी मुलीस उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यावर तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी ती मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले.

त्यानंतर पीडित मुलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आसिफ शेख विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा त्यांच्याच नात्यातील आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक आर.आर.पाटील करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune minor girl raped by relative three months pregnant vsk 98 svk

Next Story
नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करताना भाजपाच्या महिला महापौरांची जीभही घसरली; काँग्रेसने नोंदवला आक्षेप
फोटो गॅलरी