पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदी शेवटच्या क्षणी गणेश बिडकर यांचे नाव निश्चित झाल्याने गणेश घोष यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने गणेश घोष यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे महापालिकेत काल मंगळवारी स्वीकृत नगरसेवकपदाचा अर्ज दाखल करतेवेळी गणेश बिडकर यांचे नाव निश्चित झाल्याने गणेश घोष यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिकेतील भाजप च्या दोन्ही कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या प्रकारामुळे भाजप ला विरोधी पक्षाच्या टीकेला सामोरे जावे लागले. या घटनेची प्रशासनाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. अखेर या प्रकरणी महापालिकेच्या सुरक्षा आधिकाऱ्याने गणेश घोष आणि कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा आधिक तपास करण्यात येत आहे.