मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यावरुन राज्य सरकारला अल्टिमेटम दिला असल्याने सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यातही आपल्या या अल्टिमेटचा पुनरुच्चार केला होता. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली. यावेळी राज्य सरकारच्या नियमांचे पालन केले जाईल असा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी पी.ए.इनामदार म्हणाले की, “आम्ही दिवसभरात पाच वेळा नमाज पठण करतो आणि त्याचवेळी अजान होते. ही अजान सात ते आठ मिनिटांसाठी असते. पण तरीदेखील सध्या जे काही सतत भोंगे किंवा स्पीकरबाबत आवाहन केले जात आहे, त्याचा विचार करता न्यायालयं आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे यापुढील काळात पालन केले जाईल. आम्ही या नियमांची अंमलबजावणी करणार आहोत”.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune muslims decide to follow court and state government orders over masjid loudspeaker svk 88 sgy
First published on: 21-04-2022 at 15:18 IST