संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी, ५ जानेवारीला बंद राहणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे, नवीन होळकर या सर्व जलकेंद्रांवर विविध कामे करायची असल्यामुळे एक दिवसासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेने निवेदनात म्हटले आहे. शहरातील सर्व पेठा, त्याचबरोबर पर्वती, सहकारनगर, सातारा रस्ता, कात्रज, पद्मावती, संपूर्ण कोथरूड, एंरडवणे, बिबवेवाडी, तळजाई, डहाणूकर कॉलनी, लॉ कॉलेज रस्ता, हिंगणे, धायरी, आनंद नगर, वडगाव, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, भुसारी कॉलनी, पुणे विद्यापीठ, महात्मा सोसायटी, औंध, बावधन, बाणेर, कोरेगाव पार्क, कॅम्प, हडपसर, चंदननगर, येरवडा, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, खराडी, नगर रस्ता, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर या सर्व भागांमध्ये गुरुवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहील, असे महापालिकेने कळवले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2017 रोजी प्रकाशित
संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-01-2017 at 18:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune no water supply on thursday 5 january