संथ गतीने सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा वेग वाढण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. टिळक चौकात येणाऱ्या मंडळांना फारवेळ थांबून देण्यात येत नसल्याने मिरवणुकीने वेग धरला आहे. मात्र, लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्त्यावर अद्यापही रांगा असल्याने मिरवणूक लवकर संपणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : आदर पूनावाला यांच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची १ कोटींची फसवणूक

मिरवणूक लवकर संपविण्याच्यादृष्टीने आतापर्यंत पोलिसांनी प्रयत्न केले नसल्याने संथ गतीने मिरवणूक सुरू आहे. मात्र, आता पोलिसांनी हस्तक्षेप सुरू केला आहे. लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्याने येणाऱ्या गणेश मंडळांना टिळक चौकात फारवेळ थांबून देण्यात येत नसल्याने मिरवणुकीने वेग धरला आहे.दरम्यान, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावर अद्यापही मंडळांच्या रांगा आहेत.

हेही वाचा >>>पुणे : विसर्जन मिरवणुकीत अनेकाचे मोबाइल संच गहाळ

‘लोकनाथ, एकनाथ…शिवसेना शिवसेना’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचे समर्थक असलेली गणेश मंडळे ही टिळक चौकात एकत्र आल्यानंतर शिंदे गटाकडून ‘लोकनाथ, एकनाथ’ हे गाणे, तर शिवसेना समर्थक मंडळांकडून ‘शिवसेना शिवसेना’ हे गाणे लावण्यात आल्याने विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना राजकीय रंगत पाहायला मिळाली.