पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कौस्तुभ मराठे आणि मंजिरी मराठे यांनी पुणे पोलिसांनी अटक केली. मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं अमिष दाखवत अनेक ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठे ज्वेलर्सकडून विविध योजनांमध्ये गुंतवलेल्या रोख रक्कम, सोने, चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेल्या अनेक ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वलर्सचे कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे यांना पोलिसांनी अटक केली. शुभांगी विष्णू कुटे (वय ५९, रा. कोथरूड ) यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक

पुणे शहरातील मराठे ज्वेलर्समध्ये विविध सोने, चांदीच्या योजनेत पैसे गुंतवले होते. मात्र आपण गुंतवलेल्या पैशावर कोणत्याही प्रकाराचा परतावा मिळत नसल्याचे दिसून आले. त्यावर शुभांगी विष्णू कुटे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता तपासात १८ गुंतवणूकदारांची  ५ कोटी ९ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे या दोघांना अटक करण्यात आली. या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याचप्रकरणी एक महिन्याआधी प्रणव मराठेंना अटक करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrest two people from marathe jewelers sgy 87 svk
First published on: 15-09-2021 at 11:23 IST