पुणे : येरवडा परिसरात टोळक्याने कोयते उगारून वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींनी ज्या भागात वाहने फोडली. त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढण्यात आली.

हेही वाचा – Maratha Reservation Rally : मराठा आरक्षण शांतता फेरीनिमित्त शहरातील वाहतुकीत उद्या बदल

हेही वाचा – अजित पवारांनी स्वपक्षीय आमदारांचा निधी रोखला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येरवडा भागात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी सतीश चंद्रकांत मोरे (वय २७), काळूराम सुखदेव लोंढे (वय ३५), मोनेश उर्फ वंश सोमनाथ लोंढे (वय १९, रा. पाषाण) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींनी एकाला अडवून त्याला मारहाण केली होती. या भागात कोयते उगारून आरोपींनी दहशत माजवून रिक्षा, दुचाकींची तोडफोड केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींनी ज्या भागात वाहनांची तोडफोड केली. त्याच भागात आरोपींची धिंड काढली.