सोशल मीडियावर नेहमी काही ना काहीतरी ट्रेंड होत असतं. असंच एक #CoupleChallenge ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्ये प्रेमी युगुल, दांपत्य आपल्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी फोटो पोस्ट करणाऱ्यांना अलर्ट दिला असून फोटो शेअर न करण्याचं आवाहन करणारं भन्नाट ट्विट केलं आहे.

पुणे पोलिसांनी ट्विट केलं असून फोटो पोस्ट करणाऱ्यांना असं कऱण्याआधी दोन वेळा विचार करा असं सांगत जागरुक राहण्यास सांगितलं आहे. कपलचा खपल चँलेंज होईल असा शब्दांत इशाराही दिला आहे.

पुणे पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आपल्या जोडीदारासोबत फोटो पोस्ट करताना दोन वेळा विचार करा. गोड वाटणारं चॅलेंज काळजी नाही घेतली तर चुकीचं होऊ शकतं. पोलिसांनी ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये लिहिलं आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चँलेंज न करो, केला तर कपलचा खपल चँलेंज होईल’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोटो पोस्ट करताना काय धोका आहे हेदेखील पोलिसांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. आपण पोस्ट केलेले फोटो मॉर्फिंग, पॉर्न तसंच इतर सायबर क्राइमसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या असं पोलिसांनी म्हटलं आहे.