पुणे : महापालिकेच्या ७५ वर्षांच्या इतिहासात आयुक्त म्हणून सेवानिवृत्त होण्याचा मान विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना मिळाला आहे. महापालिका आयुक्त भोसले यांच्या कार्यालयात नागरिकांना सहज प्रवेेश मिळत होता. ते नागरिकांचे प्रश्न समजून घेत होते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे आयुक्त होते, अशा भावना महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

महापालिका आयुक्त डॉ. भोसले आज (शनिवारी) पुणे महापालिका आयुक्तपदावरून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त शुक्रवारी महापालिकेत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, डॉ. राजेंद्र भोसले यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.

महापालिकेतून आयुक्तपदावरून सेवानिवृत्त होत असलेल्या डॉ. भोसले यांनी राज्यात २५ ठिकाणी ३२ वर्षे काम केले. पुणे महापालिका आयुक्त म्हणून ते गेली सव्वा वर्षे काम करीत आहेत. त्यांच्या कार्यालयात कोणालाही सहज प्रवेश मिळत होता, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, मनसेचे माजी नगरसेवक बाबू वागस्कर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अनिरुद्ध पावसकर, प्रतिभा पाटील, मुख्य विधी सल्लागार निशा चव्हाण, आयुक्त डॉ. भोसले यांच्या पत्नी दीपाली भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. राजेंद्र भोसले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.