पुणे : एसटी महामंडळाकडून धार्मिक स्थळांसाठी विशेष यात्रा गाड्या सोडल्या जात आहेत. याचवेळी नियमित गाड्या सुरू करण्यात येत आहेत. शिवाजीनगर स्थानकातून आता शेगावसाठी शयनयान गाडी सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर कार्तिकी एकादशीनिमित्त जादा गाड्याही सोडल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाकडेवाडी येथील शिवाजीनगर स्थानकातून पुणे – शेगाव – पुणे ही शयनयान गाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी दररोज असून, ती रात्री ९ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता शेगावला पोहोचणार आहे. या गाडीचे भाडे ९९० रुपये आहे. या गाडीला सर्व सवलती लागू आहेत. या गाडीचे ऑनलाइन आरक्षण करता येत आहे, अशी माहिती शिवाजीनगर आगाराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली.

हेही वाचा : राज्यावर जलसंकटाचे सावट; धरणांमध्ये ६६.३१ टक्केच साठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के घट 

एसटीच्या पुणे विभागाकडून कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीहून १२ डिसेंबरपर्यंत राज्यभरात जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. आळंदी मुख्य स्थानकातून स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्थानक, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, आळंदी-चाकण मार्गावरील स्थानकातून राजगुरूनगर, नारायणगाव, संगमनेर, नाशिक, मुरबाड, कल्याण, कोपरगाव, शिर्डी, मनमाड, मालेगाव धुळे, आळंदी-वडगाव घेनंद मार्गावरील स्थानकातून शिक्रापूर, शिरूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, नांदेड, बीड, परभणी, नागपूर, जळगाव आणि डुडुळगाव वाहतूक पोलीस चौकी स्थानकाकूतन आळंदी-देहू मार्गावरील गाड्या सुटतील, अशी माहिती विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी दिली.

हेही वाचा : पुण्यातील प्रसिद्ध ‘पूना गेस्ट हाऊस’ आता चक्क टपाल पाकिटावर

अष्टविनायक दर्शन सेवा

शिवाजीनगर आगारातून अष्टविनायक दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही गाडी ३० डिसेंबरला वाकडेवाडी येथून सकाळी ७ वाजता सुटेल. ओझर येथे भक्तीनिवासात मुक्काम असून, दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबरला ही गाडी रात्री १० वाजता शिवाजीनगरला परत येईल. या गाडीचेही ऑनलाइन आरक्षण सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune shivajinagar st bus stop facility to visit religious places ashtavinayak shegaon pune print news stj 05 css