पुण्यातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक पारितोषिके

विभागीय मंडळाकडून दहावीची पारितोषिके जाहीर

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विभागीय मंडळाकडून दहावीची पारितोषिके जाहीर

दहावीच्या गुणपत्रिकांच्या वाटपाबरोबरच पारितोषिके मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये ३४ पारितोषिकांपैकी २५ पारितोषिके पुणे जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत.

दहावीचा ऑनलाईन निकाल १३ जून रोजी जाहीर झाला. राज्य मंडळाकडून किंवा विभागीय मंडळाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येत नसली तरी देणगीदारांकडून देण्यात येणारी पारितोषिके जाहीर करण्यात येतात. पुणे विभागीय शिक्षण मंडळामध्ये अशी ३४ पारितोषिके देण्यात येतात. विभागात विविध विषयांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके जाहीर करण्यात आली.

पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीनही जिल्ह्य़ांमध्ये पुणे जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पारितोषिके मिळवली आहेत. पाच पारितोषिके सोलापूर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी तर चार पारितोषिके नगर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी  मिळवली आहेत. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील समृध्दी पुरोहित हिला ९ पारितोषिके मिळाली आहेत. मराठी विषयात शिरुरच्या विद्याधाम प्रशालेतील देवेंद्र वेताळ या विद्यार्थ्यांला आठ पारितोषिके मिळाली आहेत.

पारितोषिक विजेते विद्यार्थी

 • मराठी (प्रथम) – देवेंद्र वेताळ (विद्याधाम प्रशाला, शिरुर), अनन्या जोशी (एमईएस बालशिक्षण मंदिर, पुणे)- प्रियांका नरसाळे (श्री गोरेश्वर माध्यमिक विद्यालय, नगर) ९६ गुण
 • गुजराथी (प्रथम) – राज डागा ९१ गुण (आर.सी.मेहता गुजराथी हायस्कूल, पुणे)
 • कन्नड (प्रथम) – नेत्रावती पुजारी ९५ गुण (डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल, पुणे)
 • हिंदी (प्रथम) – शिवानी कटके ९८ गुण (कानिफनाथ विद्यालय, भिवरी)
 • इंग्रजी (प्रथम) -प्रतीक्षा वाघमारे ९८ गुण (महाराष्ट्र विद्यलय, सोलापूर)
 • इंग्रजी (रात्रशाळा प्रथम) – महेश शिंदे ७१ गुण (भाई सथ्था नाईट स्कूल, नगर)
 • संस्कृत (प्रथम) – समृध्दी पुरोहित १०० गुण (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी)
 • गणित (प्रथम) – शंतनु वडगांवकर १०० गुण (अहमदनगर एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल)
 • गणित (तृतीय) – अभिषेक ढालपे ९८ गुण (एम. ई. एस. हायस्कूल, बारामती)
 • विज्ञान (प्रथम) – अभिषेक ढालपे (एम.ई.एस.हायस्कूल, बारामती), सलोनी शेटय़े (डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल, औंध), १०० गुण
 • समाजशास्त्र (प्रथम) – विनायक गोडबोले १०० गुण (कवठेकर हायस्कूल, सोलापूर)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune ssc students get most prizes

ताज्या बातम्या