पुणे शहरातील शालेय बससेवा दरवाढीच्या मुद्यावरील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शहरातील खासगी तसेच पालिकेच्या शाळांना भाडेतत्वावर पुरवण्यात येणाऱ्या बसचे दर अचानकपणे वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर नगरसेवक तसेच पालिका प्रशासनाने नाराजी व्यक्त केल्यानंतर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी देखील मुंढेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बस दरवाढीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पालिकेमध्ये विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मुंढेची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र तुकाराम मुंढे यांनी या चर्चेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे तुकाराम मुंढेना पुन्हा शासनात घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकप्रतिनिधींच्या या मागणीवर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी तुकाराम मुंढेची बाजू घेतली आहे. ते म्हणाले की, मुंढे कोणाचे ही ऐकत नाहीत हे जरी वास्तव असले तरी सध्या पीएमपीएमलला रिंग मास्टरची गरज आहे. ती कामगिरी ते चोखपणे बजावत आहेत. डबघाईला आलेल्या पीएमपीएमला सुस्थितीत आणण्यासाठी ते अध्यक्षपदी कायम असणे गरजेचे आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. या पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मुंढेनी कामाचा धडका सुरु केला. या निर्णयामुळे मुंढे यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी आणि नागरिकांचा रोष ओढून घेतला आहे.  ही दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेसह विद्यार्थीं देखील पालिकेच्या दारी आले होते. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी मुंढे समवेत बुधवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतला. पण या बैठकीकडे मुंढे फिरकलेच नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune student bus fare public representatives demand tukaram mundhe for cm devendra fadnavis
First published on: 29-06-2017 at 15:05 IST