पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चालकाला अटक केली. वाहनचालकाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. नागनाथ गायकवाड (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुणे : गणेशोत्सव खरेदीसाठी गर्दी; बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडीत भर

हेही वाचा – पुणे: लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला मारहाण करून तीन लाखांची रोकड लूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायकवाड विद्यार्थी वाहतूक करतो. घरासमोर तो त्याचे वाहन लावतो. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शाळकरी मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी गायकवाडने खाऊचे आमिष दाखविले. तो मुलीला घरासमोर लावलेल्या बसमध्ये घेऊन गेला. त्याने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. बसजवळ कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने गायकवाडने मुलीला सोडून दिले. गायकवाड तेथून पसार झाला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती नात्यातील महिलेला दिली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गायकवाडला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.