पुणे : महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लीम बांधवांकडून रविवारी (१ ऑक्टोबर) मिरवणूक काढण्यात येणार आहे. नाना पेठ, लष्कर भाग, तसेच लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक ते हमजेखान चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ रविवारी दुपारी नाना पेठेतील मनुशाह मशीद येथून करण्यात येणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक, नेहरू रस्त्यावरील एडी कॅम्प चौक येथून डावीकडे वळून मिरवणूक भारत चित्रपटगृह, पद्मजी पोलीस चौकी, भवानी पेठ, निशात चित्रपटगृह, चुडामण तालीम चौक, मुक्ती फौज चौक, लष्कर भागातील जान महंमद रस्ता, बाबाजान दर्गा, चार बावडी पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, साचापीर स्ट्रीट, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौकातून डावीकडे वळून मिरवणूक महाराणा प्रताप रस्ता, गोविंद हलवाई चौक, सुभानशाह दर्गा चौक येथे जाणार आहे.

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
vasai virar municipal corporation marathi news
महावीर जयंती निमित्त चिकन, मटण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश; पालिकेच्या निर्णयाविरोधात वसईकरांचा संताप
Traffic changes in Collectorate area on the occasion of Dr Ambedkar Jayanti
पुणे : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

हेही वाचा : आळंदी: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलं माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन

शुक्रवार पेठेतील सिटी जामा मशीद चौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली असून, मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.