पुणे : शहरात लूटमार करणाऱ्या चोरट्याकडून विश्रामबाग पोलिसांनी दोन पिस्तुलांसह चार काडतुसे जप्त केली. नवी पेठेतील शास्त्री रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली. रफिक सलीम खान (वय ३६, रा. जिवलग हाऊसिंग सोसायटी, निगडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

नवी पेठेतील शास्त्री रस्ता परिसरातून पादचारी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याची घटना घडली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसंचे पथक गस्त घालत होते. शास्त्री रस्त्यावर पादचारी महिलेच्या गळ्यातील दागिने रफिक खान याने हिसकावून नेल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी सचिन कदम यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीत बंडखाेरीचे फटाके

हेही वाचा – पुणे : नवले पूलावर अपघात; एक ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निगडी परिसरात खानच्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले. त्याच्या घरातून सोनसाखळी, दोन पिस्तुले, चार काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खानविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, मयूर भोसले, अशोक माने, गणेश काटे, शैलेश सुर्वे, जाकिर मणियार यांनी ही कारवाई केली.