बिबवेवाडी येथील ‘ईएसआयसी’ रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज (रविवार) आढावा घेतला. ईएसआयसीतच्या साडेसोळा एकर जागेवर ५०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या वर्षाअखेरपर्यंत आवश्यक परवनग्या आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या मागणीवरून यादव यांनी रुग्णालयाला भेट दिली. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune union labor minister bhupendra yadav reviewed the work of esic hospital in bibwewadi pune print news msr
First published on: 21-08-2022 at 20:02 IST