विद्यापीठाकडून समितीची स्थापना

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षांव्यतिरिक्त नव्या पद्धती विकसित करून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ओपन बुक एक्झामसारख्या पर्यायांची

चाचपणी त्यात करण्यात येणार असून, नवी पद्धती विकसित करण्यासाठी विद्यापीठाने समिती नियुक्त के ली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन विद्यापीठाला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागत आहेत. अंतिम वर्ष परीक्षांमध्ये के वळ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागली.

पण सत्र परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर के ला. मात्र या परीक्षेदरम्यान विद्यार्थी विविध मार्गानी गैरप्रकार करत असल्याचे आढळून आले आहे.

तसेच ऑनलाइन परीक्षांच्या निकालाची टक्के वारीही वाढल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षांची पारंपरिक मूल्यमापन पद्धतीच कायम न ठेवता नवी पद्धती विकसित करण्याची गरज लक्षात घेऊन विद्यापीठाने त्यासाठी हालचाली सुरू के ल्या आहेत.

कु लगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, की बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन के वळ परीक्षा या मूल्यमापन पद्धतीवर अवलंबून राहता येणार नाही. आता नव्या मूल्यमापन पद्धतींचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यात बहुपर्यायी प्रश्नांचे प्रमाण कमी करून ओपन बुक एक्झाम, सर्वेक्षण, प्रकल्प असे वेगवेगळे पर्याय विचारात घेऊन नवी पद्धत विकसित करता येऊ शकते. त्या दृष्टीने तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे.

सर्व पर्याय, शक्यतांचा अभ्यास करून समितीकडून अहवाल सादर करण्यात येईल. त्यानुसार कार्यवाही करून पुढील परीक्षांपासून नवी मूल्यमापन पद्धती वापरता येईल का, याचा विचार करता येईल.

नव्या मूल्यमापन पद्धतीतील काही पर्याय

*  ओपन बुक एक्झाम

*  गृहपाठ (होम असाइन्मेंट)

*  विविध विषय प्रकल्पांवर (प्रोजेक्ट) परीक्षा

*  प्रात्यक्षिके

*   विद्यार्थ्यांची वर्षभरातील   शैक्षणिक कामगिरी