पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ अंतर्गत पुणे वाहिनीवर किलोमीटर क्र. २७ आणि कि.मी. क्र. ५५ येथे १८ आणि १९ मे या दोन दिवशी कमानीची (गॅन्ट्री) तांत्रिक तपासणी, दुरुस्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – बालभारती पौडफाटा रस्त्यावरून राजकारण तापले…शिवसेना ठाकरे गटाची भाजपवर टीका

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे वाहिनीवर १८ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने शेडूंग, खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. तसेच १९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करुन द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने कुसगाव पथकर नाक्यावरुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. या अनुषंगाने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे, या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे रस्ते महामंडळाने सांगितले.