पुणे : पर्वती पाणीपुरवठा केंद्रासह चांदणी चौक, वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (१७ जुलै) कोथरुड, कर्वेनगरसह शहरातील मध्यवर्ती पेठा, तसेच सहकारनगर, कात्रज भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१८ जुलैला) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणारा भाग – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, डेक्कन, शिवाजीनगर, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, सॅलसबरी पार्क, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर.

वारजे जलकेंद्र : चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड, सेंटिन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, बावधन, उजवी भुसारी कॉलनी, डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरजनगर, सागर कॉलनी, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतिबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीजवळील भाग शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रोड इत्यादी.

गांधी भवन टाकी : काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यू.पी योजना, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचनगंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क, आरोह सोसायटी, शांतिवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, मुंबई-पुणे बायपास रस्ता दोन्ही बाजू, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपतीनगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड. बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, कर्वेनगर, वारजे, एनडीए रस्ता.

एस.एन.डी.टी. पपिंग स्टेशन : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅप्पी कॉलनी, मेघदूत, तेजसनगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंधानगर, जयभवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, भीमनगर, वेदान्तनगरी, कुलश्री कॉलनी परिसर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चतुःशृंगी टाकी परिसर : औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंधसोसायटी, औंध गाव परिसर, पॅनकार्ड रोड, वीरभद्रनगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग.