पुणे : नात्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन एकाला बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची घटना दांडेकर पूल परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. कौस्तुभ जयदीप नाईक (वय २९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पंकज नांगरे (वय ३१, रा. दांडेकर पूल) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौस्तुभचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. बहिणीला पळवून नेण्याची धमकी त्याने आरोपीला दिली होती. या कारणावरुन आरोपीने कौस्तुभला सोमवारी सायंकाळी दांडेकर पूल परिसरात बोलावून घेतले. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी कौस्तुभला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या कौस्तुभला तातडीने रग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद तर शुक्रवारी विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

हेही वाचा – भाजपचा विधानसभा जाहीरनामा आता ‘अंमलबजावणी आराखड्या’च्या स्वरुपात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर परिसरात गेल्या दोन दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. हडपसर भागात आर्थिक वादातून एका तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ टाकून देण्यात आला होता. त्यानंतर चारित्र्याच्या संशयातून रविवारी मध्यरात्री महिलेच्या डोक्यात सिलिंडरची टाकी घालून खून करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली होती. सोमवारी सायंकाळी दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली.