युवा पिढीतील सर्वात लोकप्रिय गायकाशी संवाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : युवा पिढीतील लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्याशी संवाद साधण्याची संधी शुक्रवारी (१७ जुलै) लाभणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात प्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे हे राहुल देशपांडे यांच्याशी गप्पा मारणार आहेत. सायंकाळी पाच वाजता हा दूरचित्र संवाद रंगणार आहे.

‘माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं’ असे अभिमानाने सांगणारे ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू असलेल्या राहुल देशपांडे यांनी लहान वयापासूनच गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. उषा चिपलकट्टी, पं. गंगाधरबुवा िपपळखरे आणि पं. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या राहुल यांना ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र यांची तालीम मिळाली आणि त्यांच्या गायकीला पैलू पाडले गेले. दूरचित्रवाणीवरील ‘सूर ताल’ आणि ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाद्वारे अफाट लोकप्रिय झालेल्या राहुल देशपांडे यांच्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, सिंगापूर आणि अमेरिकेमध्ये संगीत मैफिली झाल्या आहेत.

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकी आणि अभिनयाने रसिकांच्या स्मरणात राहिलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या संगीत नाटकाचे राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवन केले आहे. वसंतराव यांनी अजरामर केलेली ‘खाँसाहेब’ यांची भूमिका त्यांनी या नाटकातून साकारली. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही वर्षांपासून राहुल देशपांडे ‘वसंतोत्सवा’चे आयोजन करीत आहेत. संगीत रंगभूमीवर मानाचे पान ठरलेल्या ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत मानापमान’ या नाटकांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे.

सहभागासाठी : http://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_17July या लिंकवर नोंदणी करा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul deshmukh in loksatta sahaj bolta bolta event zws
First published on: 12-07-2020 at 03:59 IST