पुण्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे उकाडयाने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यात लवकरच मान्सूनचे जोरदार आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत शहरात ३४.२ अंश कमाल आणि २३.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात शहरात मुसळधार पाउस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
सदाशिव पेठ, नारायण पेठ, मंडई, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, धायरी, माणिक बाग,सिंहगड रोड परिसर, पुणे स्टेशन, मार्केटयार्ड, धनकवडी, कात्रज, कोंढवा आणि कोरेगाव पार्क या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.