महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले. राज हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीच्या कामानिमित्त दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. दौ-याच्या पहिल्याच दिवशी राज हे पुस्तक खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र बाजीराव रस्त्यावरील एका पुस्तकाच्या दुकानात जात असताना राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतपल्याचं दिसून आलं. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहून त्यांनी ‘काही जगू द्याल की नाही?’ असं म्हणत त्यांना कॅमेरे बंद करायला लावले आहेत. हा सर्व घटनाक्रम कॅमेरात कैद झाला असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

झालं असं की, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीत पुस्तक खरेदी करण्यासाठी पोहोचले. दरम्यान, याठिकाणी राज ठाकरे येणार म्हणून प्रसारमाध्यमांच्या काही लोकांनी गर्दी केली होती. गाडीतून उतरल्यानंतर राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापले. ते प्रतिनिधी रिज यांच्या जवळ येऊन फोटो काढू लागल्यानंतर राज यांनी, ‘ऐ लाईट बंद करा रे, काही जगू द्याल की नाही’ अशा शब्दांत माध्यम प्रतिनिधींना खडसावलं आहे. या दुकानामधून राज ठाकरेंनी जवळपास ५० हजार रुपयांची १५० हून अधिक पुस्तके खरेदी केल्याचं सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज यांच्या दोन दिवसीय दौऱ्याबद्दल माहिती देताना मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं की, “आम्ही २१ ते २७ मेदरम्यान पुण्यात एका सभेच आयोजन करत आहोत. ही सभा नेमकी कुठे होणार? त्याबाबत राज ठाकरे उद्या घोषणा करणार आहेत.” राज यांनी पुस्तकांच्या दुकानाला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, वनिता वागसकर यांच्यासह आजी माजी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.