महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असल्याचे फलक पुण्यातील काही चौकांमध्ये लागले आहेत. एकीकडे पक्षाचे काही पदाधिकारी सभा नेमकी कुठे होणार, हे अजून निश्चित झालेले नाही, असे सांगत असताना काही जणांनी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार असल्याचे फलक लावले आहेत. त्यामुळे सभेच्या ठिकाणावरून सुरू असलेल्या गोंधळात आणखी भर पडल्याचे चित्र आहे.
येत्या रविवारी संध्याकाळी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. गेल्या आठवड्यात पुणे दौऱयावेळीच त्यांनी नऊ फेब्रुवारीला जाहीर सभा घेण्याचे सांगितले होते. मात्र, सभेच्या ठिकाणावरून सुरू असलेला गोंधळ अजूनही कायम आहे. राज ठाकरे यांच्या सभेसाठी स. प. महाविद्यालय आणि टिळक चौक हे पर्याय पक्षाने निवडले होते. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलीसांनी टिळक चौकातील सभेला परवानगी नाकारली आहे. स. प. महाविद्यालयाची परवानगीही मिळाली नसल्याचे बुधवारी संध्याकाळी सांगण्यात आले. मात्र, मनसेचे पदाधिकारी राम बोरकर यांच्या नावाने पुण्यातील मेहेंदळे गॅरेजजवळ लावण्यात आलेल्या फलकांवर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार असल्याचे लिहिण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
राज ठाकरेंची सभा स. प. महाविद्यालयातच? पुण्यातील फलकांवर ठिकाण जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असल्याचे फलक पुण्यातील काही चौकांमध्ये लागले आहेत.
First published on: 06-02-2014 at 01:16 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackerays rally in s p college