राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी येत्या २९ जूनला पुण्यातील अलका चौक ते साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले असून त्याच्या निषेधार्थ २९ जून रोजी पुण्यात मोर्चा काढला जाणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी अद्यापही एफआरपी दिली नाही. ती त्वरित द्यावी किंवा साखर आयुक्तांनी कारखान्याच्या मालकीची मालमत्ता जप्त करावी. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट असून दुधाचे दर घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally for farmers problem in pune on 29 th june says rajy shetty
First published on: 20-06-2018 at 17:28 IST