scorecardresearch

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार; एकाच्या विरोधात गुन्हा

विवाहाबाबत विचारणा केल्याने मारहाण; पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागातील घटना

crime
(फाईल फोटो)

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर तिला मारहाण करणाऱ्या सनी सुनील छजलानी (वय ३३, रा. इव्हज गार्डन, केशवनगर, मुंढवा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी छजलानी आणि महिला यांची ओळख आहे. छजलानीचा विवाह झाला होता. मात्र त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. छजलानीने तिला अविवाहित असल्याचे सांगितले होते. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा तिला मारहाण करुन धमकावले.

महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rape of a woman on the pretext of marriage crime against one pune print news msr