पुण्याच्या लोणावळ्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस झाला असून २४ तासांमध्ये तब्बल २७३ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. लोणावळ्यात आत्तापर्यंत एकूण २०१७ मिलीमीटर पाऊस झाला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच म्हणावा लागेल. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत २६२२ मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या तीन दिवसांपासून वरून राजाने लोणावळा परिसरात जोरदार हजेरी लावली असून सलग तिसऱ्या दिवशी पावसाने या मोसमातील विक्रमी नोंद केली आहे.

पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यामध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २७३ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. अक्षरशः लोणावळाकरांना पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र लोणावळ्यात बघायला मिळालं. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली.

हेही वाचा – पिंपरीतील शाळांचा परिसर पान टपऱ्यामुक्त!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणावळ्यातील सहारा ब्रिज याठिकाणी असलेले टाटा धरण हेदेखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तसा इशारा संबंधित टाटा धरण अधिकाऱ्यांनी दिला आहे. टाटा धरणाचं पाणी हे इंद्रायणी नदीत सोडण्यात येतं. त्यामुळे इंद्रायणी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – पुण्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’

गेल्या तीन दिवसांत कोसळलेल्या पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे –

  • गेल्या २४ तासांत २७३ मिलीमीटर म्हणजे १०.७५ इंच पाऊस कोसळला आहे. (आजची आकडेवारी)
  • एकूण तीन दिवसांमध्ये तब्बल ७०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.