महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२३ जाहीर करण्यात आली. त्यानुसार या परीक्षेद्वारे पाच विभागातील ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, पूर्व परीक्षा ४ जून रोजी ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे.

हेही वाचा >>>कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग या विभागातील ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येईल. त्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा ७ ते ९ ऑक्टोबर, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबरला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परीक्षेसाठी २ ते २२ मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येईल. चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २८ मार्च ही अंतिम मुदत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परीक्षेबाबतच्या सविस्तर सूचना एमपीएससीच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.