ऑनलाइन व्यवहारातील अडचणींवर उतारा

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

पुणे : ऑनलाइन भाडेकरार नोंदवण्यात सध्या असंख्य अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाडेकराराचे दस्त नोंदणीसाठी प्राप्त झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत दस्त नोंदणी करण्याचे आदेश नोंदणी उपमहानिरीक्षक हिंमत खराडे यांनी दिले. दरम्यान, दस्त नोंदणीसाठी आलेल्या भाडेकरारांची संख्या जास्त असल्यास शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाडेकराराचे दस्त दुय्यम निबंधक कार्यालयांकडे पाठवल्यानंतर नागरिकांना सध्या दस्त मिळण्यास विलंब होत आहे. यासाठी दोन ते तीन आठवडे सतत पाठपुरावा करण्याचा त्रास नागरिकांना होत आहे. याबाबत असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटच्या शिष्टमंडळाने उपमहानिरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानुसार खराडे यांनी याबाबतचे लेखी आदेश राज्यातील सह जिल्हा निबंधकांना दिले आहेत.

असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले, ‘भाडेकरारांच्या दस्त नोंदणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाल्यास दावा दाखल करण्यासाठी भाडेकराराची प्रत आवश्यक असते. त्यासाठी भाडेकरारांच्या सूची क्रमांक दोन आणि दस्तांची प्रमाणित प्रत दुय्यम निबंधकांनी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.’

जाच काय?

लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अनुसार १२ तासांमध्ये ऑनलाइन दस्त नोंदवून घेण्याचे आदेश असले, तरी दस्त नोंदवण्यासाठी नागरिकांना दहा ते ३० दिवस वाट पाहावी लागत आहे.  हे कायद्याचे उल्लंघन असल्याने संबंधित दुय्यम निबंधकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.