पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे एकही बेकायदा लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) उभारु देऊ नका, सर्व फलकांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट)करावे. शहराचे विद्रुपीकरण  करणारे फलक तत्काळ काढण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.

किवळेतील दुर्देवी घटनेनंतर खासदार बारणे यांनी शहरातील बेकायदा फलकांसंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. बेकायदा ४३३ फलकांबाबत लवकर सुनावणी घेण्याची न्यायालयाला विनंती करावी. नव्याने आढळलेल्या ७२ बेकायदा फलकांवर कारवाई करावी. काही जाहिरात व्यावसायिकांनी परवानगीपेक्षा मोठ्या आकाराचे फलक उभारले आहेत. परवानगीपेक्षा मोठे फलक उभारणा-यांवर कारवाई करावी. फलक उभारण्यास परवनागी देताना शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. परवानगी देण्यासाठी नवीन प्रणाली आणावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

हेही वाचा >>> पिंपरी महापालिकेकडून मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २७६ कोटी

गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवा

 रावेत येथील १६ एकर गायरान जागा  महापालिकेला हस्तांतरित झाली आहे. त्यापैकी काही जागेवर पाण्याचे जलकुंभ (टाक्या) उभारले आहेत. उर्वरित जागेवर पंतप्रधान आवास योजना प्रस्तावित आहे. याठिकाणी आवास योजना राबवू नये, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. ग्रामस्थ न्यायालयात गेले आहेत. आवास योजनेऐवजी परिसरातील नागरिकांसाठी उद्यान, मैदान, विकसित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यानुसार गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

हेही वाचा >>> पिंपरी- आकुर्डीत सहा मे ला ‘मराठा आरक्षण एल्गार परिषद’

कुस्त्यांच्या आखाडासाठी जागा राखीव

आकुर्डीतील खंडोबा मंदिरालगत महापालिकेची मोकळी जागा आहे. या जागेवर यात्रा भरते. कुस्त्यांचे आखाडे होतात. त्यामुळे महापालिकेने ती जागा देखभाल दुरुस्तीसाठी मंदिर समितीला द्यावी. कुस्त्यांच्या आखाडासाठी जागा राखीव ठेवावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाश चिन्ह व परवाना विभागात मोठा भ्रष्टाचार, गैरप्रकार होत आहे. या विभागात वर्षानुवर्षे काम करणारे अधिकारी, कर्मचा-यांची दुस-या विभागात बदली करावी. या विभागाचा आयुक्तांनी दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा.

– श्रीरंग बारणे, खासदार