scorecardresearch

पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू

या प्रकरणी एका मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Retired navy officer died pune
भरधाव मोटारीच्या धडकेने निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

भरधाव मोटारीच्या धडकेने निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील शास्त्रीनगर रस्त्यावर घडली. या प्रकरणी एका मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुण्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, नाराज बाळासाहेब दाभेकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार

हेही वाचा – “शरद पवारांनी पुढाकार घेऊन चिंचवड, कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी”, चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन, अंधेरी निवडणुकीचा दिला दाखला

प्रकाशचंद्र लक्ष्मणराव तेलंग (वय ७३, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे. तेलंग यांची सून प्रज्ञा (वय ३३) यांनी या संदर्भात येरवडा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेलंग नौदलातून निवृत्त झाले होते. तेलंग हे रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येरवड्यातील शास्त्रीनगर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने तेलंग यांना धडक दिली. अपघातानंतर जखमी झालेल्या तेलंग यांना मोटारचालक महिलेने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी मोटार चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 18:01 IST