पिंपरी- चिंचवड: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवारांवर मावळ राष्ट्रवादीचे आमदार, अजित पवारांचे कट्टर समर्थक सुनील शेळके यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते अजित पवारांना लक्ष करत आहेत. रोहित पवारांनी लक्षात ठेवावं अजित पवारांमुळेच त्यांना कर्जत – जामखेडची उमेदवारी मिळाली आहे. त्या मतदारसंघाचा विकास झाला आहे. असा घणाघात सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा : पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…

shrirag barne 10 exam marathi news
मावळ : श्रीरंग बारणे अब्जाधीश; नेमकी किती आहे संपत्ती…६०व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”

आमदार सुनील शेळके म्हणाले, रोहित पवारांना स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. पण, अजित पवारांनी महाराष्ट्रासाठी गेली २५ वर्ष झालं रक्ताचं पाणी केलं आहे. त्या अजित पवारांवर बोलून रोहित पवारांना मोठं व्हायचं आहे. मुळात अजित पवार यांनीच रोहित पवारांना राजकारणात आणलं आहे. कर्जत- जामखेडला उमेदवारी मिळवून त्यांना आमदार केलं. मतदारसंघाचा विकास केला. शेळके, लंके यांच्या पेक्षा अधिक प्रेम दिलं. पण, रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडत आहे. म्हणून अजित पवारांवर ते टीका करतात. पुढे ते म्हणाले, २०१९ ला ज्या घडामोडी घडल्या. त्या घडत असताना सर्व नेते एकत्र होते. कुठली भूमिका बदलायची?, कुणाला कुठली खाती द्यायची?, महायुतीत गेल्यास आपल्याला काय मिळेल?, या सर्व घडामोडी प्रत्येकाला माहीत आहेत. तरीही केवळ अजित पवारांना व्हिलन केलं जातं आहे. यावर अजित पवारांनी प्रत्यक्षात बोलावं. अजित पवारांना विरोधक व्हिलन, मलिदा गँग म्हणून बोलत आहेत. अजित पवारांनी सांगावं अशी वेळ आली आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडल्यास रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना रस्त्यावर जनता फिरू देणार नाही. असा हल्लाबोल आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.