आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला काही तास शिल्लक राहीले असून त्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळ आणि प्रत्येक घरात स्वागताची तयारी सुरू आहे. पण याच दरम्यान पुण्यातील श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी हे करणार असल्याचे या मंडळाच्या विश्वस्ताकडून जाहीर करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळा पुणे शहरात आगमन होताच. संचेती हॉस्पिटलपासून डेक्कन येथील संभाजी महाराजाच्या पुतळ्यापर्यंत दरवर्षी संभाजी भिडे गुरुजी संबध धारकर्‍यासह सहभागी होतात. तर त्यापूर्वी जंगली महाराज मंदिरात उपस्थित धारकर्‍याना संभाजी भिडे गुरुजी विशेष मार्गदर्शन देखील करतात. पण याच पालखी सोहोळ्यास काही महिनेच झाले असताना. आता गणेशोत्सव दरम्यान संभाजी भिडे गुरुजी हे पुण्यातील श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि दांडेकर पुलाजवळ असणार्‍या साने गुरुजी तरुण मित्र मंडळ या दोन्ही मंडळाच्या बापाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे  संभाजी भिडे गुरुजी यावेळी काय मार्गदर्शन करणार याकडे सर्व गणेश मंडळाचे आणि नागरिकांची लक्ष लागून राहिले आहे.