संपर्क फॉर समर्थन या उपक्रमातंर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहंनी आज (रविवार) पुण्यात सांयकाळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. केंद्र सरकारच्या मागील चार वर्षांच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी देशातील प्रतिष्ठितांना भाजपाचे नेते भेट देत आहेत. त्यातंर्गतच शाह यांनी आज पुण्यात पुरंदरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. बाबासाहेब पुरंदरेंनी अमित शाहंना छत्रपती शिवाजी महाराजांवरील दोन पुस्तके भेट दिली. बाबासाहेब पुरंदरेंना भेटून आपल्याला खूप आनंद झाल्याचे अमित शाहंनी म्हटले.

 

याप्रसंगी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश बापट आदी उपस्थित होते.