पुणे प्रतिनिधी: ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांना “हिंदू विरोधी, मार डालूंगा तुझे दिल्ली में मिल, एके 47 से उडा दूंगा मूसेवाला टाईप,लॉरेन्स की ओरसे ये मेसेज है समझ ले”, असा धमकीचा आल्याची घटना घडली आहे
त्याबाबत शिंदे गटातील शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतरे म्हणाले की, संजय राऊत आणि मी जवळपास सात वर्ष प्रवक्ते म्हणून काम केले आहे. आम्ही दोघांनी शिवसेनेची बाजू मांडण्याच काम केलं आहे.संजय राऊतांसारखा माणूस अशा धमक्याना भीक घालणारा नाही. ते सच्चा शिवसैनिक असून बिष्णोई किंवा कोणीही असू त्याचा त्यांना काही फरक पडत नाही. राज्याच्या दृष्टीने संजय राऊत हे महत्वाचे नेते असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या संरक्षणाची काळजी घेण्यास सक्षम नेते आहे. तसेच केवळ चर्चेत राहण्यासाठी देखील असं केलं असल्याची शक्यता विजय शिवतरे यांनी व्यक्त केली.