पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने आणि अल्प आजाराने बुधवारी निधन झाले. विख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे मुलगा ज्येठ पत्रकार रोहित, स्नूषा गायत्री असा परिवार आहे.

चंदावरकर यांचे शालेय शिक्षण कोकणात आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील वाडिया महाविद्यालयात झाले. १९७३ मध्ये अभिनव विद्यालय शाळेच्या इंग्रजी माध्यम विभागाची त्यांनी सुरुवात केली. ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रयोग केले.

jalna kailas gorantyal and arjun khotkar
जालन्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीवरून श्रेयाची लढाई
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Nagpur mowad family suicide
धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; नागपूरच्या मोवाड गावातील घटना
Poet writer Keki Daruwala passed away
कवी, लेखक केकी दारूवाला यांचे निधन; पोलीस, ‘रॉ’मध्ये यशस्वी कारकीर्द
harihar babrekar
वसईतील ज्येष्ठ पत्रकार हरिहर बाबरेकर यांचे निधन
Suresh Wayangankar death marathi news
वसईतील शिक्षणमहर्षी सुरेश वायंगणकर यांचे निधन
Famous writer and director Madhura Jasraj passed away
प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांचे निधन
Dr Ajit Ranades removal from the post of Vice-Chancellor caused intense displeasure in Dombivli
विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटविल्याने डोंबिवलीत तीव्र नाराजी

हेही वाचा >>>उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?

शाळेतील काचणाऱ्या गोष्टी टाळून मुलांना समृद्ध करणारे अनुभव अखंड देत राहणे, त्यांचा विकास घडवणे, मुलांच्या आयुष्यात शाळा ही रम्य आठवणींची साखळी ठरावी या तत्त्वावर विश्वास ठेवून चंदावरकर यांनी शिक्षणक्षेत्रात योगदान दिले. आधुनिक बालमानसशास्त्राच्या आधाराने त्यांनी अनोखे उपक्रम राबवले. अक्षरे, आकडे शिकण्याबरोबर साहित्य, संगीत, चित्रकला अशा विषयांना त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले. पुण्यातील अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी तीस वर्षे काम केले. त्यानंतर न्यू इंडिया शाळेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले.

प्रयोगशील शिक्षिका, बालविकासासाठी अध्यापनात नावीन्यपूर्ण कल्पना, पद्धतींचा उपयोग करण्यासाठी त्यांचा नावलौकिक होता. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.