पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ७ हजार २७३ उमेदवार पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्यांची टक्केवारी ६.६६ आहे.

विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. त्यानुसार ३९वी सेट परीक्षा ७ एप्रिल रोजी १७ शहरांमधील केंद्रांवर घेण्यात आली. एकूण एक लाख ९ हजार २५० उमेदवारांनी ही परीक्षा दिली. मात्र या परीक्षेला एसईबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आल्याने त्याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.

Teacher Eligibility Test, Extension of time,
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यास मुदतवाढ…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Big update regarding MPSC Prelims Exam
‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट… अखेर तारीख…
MPSC, MPSC instructions, MPSC latest news,
एमपीएससीकडून महत्त्वाच्या सूचना जाहीर, उमेदवारांनी पर्याय बदलताना….
MPSC, MPSC combine exam,
‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षेची जाहिरात कधी येणार बघा? आयोगाने सांगितले…
mpsc secretary on postpone exams marathi news
‘एमपीएससी’च्या १८ आणि २५ ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यावर आयोगाच्या सचिव काय म्हणाल्या?
Lakhat Ek Aamcha dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील मासिक पाळीचा सीन बघून नेटकरी म्हणाले, “असे विषय…”
MPSC, MPSC notice, MPSC Exam,
‘एमपीएससी’ : २५ ऑगस्टच्या संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्त्वाची सूचना

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी पोलिसांची तारांबळ

हेही वाचा – पुणे : लष्कर भागात टोळक्याची ‘गटारी’ला मद्याच्या दुकानात तोडफोड

विद्यापीठाच्या https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.