मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार करुन २७ लाख ४५ हजारांची रोकड लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. चोरट्यांकडून ११ लाख १८ हजारांची रोकड, सात मोबाइल संच, तीन दुचाकी, कोयता असा १३ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे: खंडाळा घाटात ट्रकची बसला धडक; ११ जण जखमी

या प्रकरणी अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता (वय २०, रा. मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय २८, रा. रामनगर, वारजे), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय १९, रा. राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश कसबे (वय २०, रा. मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे (वय २३, रा. रामनगर, वारजे), गुरूजनसिंह सेवासिंह वीरक (वय २०, रा. शिवाजीनगर), निलेश बाळू गोठे (वय २०, रा. मंगळवार पेठ) यांना अटक करण्यात आली. मार्केट यार्डातील भुसार बाजार परिसरात पी. एम. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात शनिवारी (१२ नोव्हेंबर) आरोपी शिरले. आरोपींनी कुरिअर कंनपीतील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्या वेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रतिकार केला. आरोपींनी पिस्तुलातून जमिनीवर गोळीबार करुन २७ लाख ४५ हजारांची रोकड लुटली.

हेही वाचा- ‘वडील कर्ज फेडणार आहेत त्यांना खुश कर’; सासऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला पतीकडून मारहाण

या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून आरोपींकडून माग काढण्यात येत होता. आरोपी गुप्ता याच्या विरोधात वारजे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. तेव्हापासून तो पसार झाला होता. आरोपी मारणे याच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर ताे कारागृहात होता. न्यायालयाकडून जामिन मिळवून मारणे कारागृहातून बाहेर आला होता. गुप्ता, मारणे आणि साथीदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. कुरिअर कंपनीत दरोडा गुप्ता आणि साथीदारांनी घातल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी पडताळले होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गुप्तासह, साथीदारांना पकडले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. .

कारागृहात कट

आरोपी गुप्ता, मारणे आणि साथीदारांची कारागृहात ओळख झाली होती. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मोठी रोकड असते. त्यामुळे गुप्ता आणि मारणे यांनी साथीदारांशी संगनमत करुन कुरिअर कंपनीतील रोकड लुटण्याचा कट कारागृहात रचल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven robbers arrested in pune market yard robbery case pune print news dpj
First published on: 14-11-2022 at 16:55 IST