पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक घटना घडली. सत्तावीस वर्षीय चुलत्यानेच आपल्या सात वर्षीय पुतणीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना दिनांक १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता पिंपरी येथे घडली आहे. अशी फिर्याद आज पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी आणि नराधम चुलता हे एकाच घरात राहतात.  दिनांक १६ मार्च रोजी पीडित मुलीच्या आजीचा मृत्यू झाल्याने तिची आई घराबाहेर गेली होती. पीडित मुलगी घरात एकटीच होती. याचाच गैरफायदा घेत चुलत्याने घरात आपल्या सात वर्षीय पुतणीवर अत्याचार करत अश्लील चाळे केले. ही घटना घडल्यानंतर तीन ते चार दिवसांनी पीडित मुलीची प्रकृती बिघडली आणि हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलिसात दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप चुलत्याला ताब्यात घेतलेलं नाही. पुढील तपास आर. टी. सावंत महिला उप निरीक्षक करत आहेत.