पिंपरी- चिंचवडमध्ये इंद्रायणी नदीत दोन तरुण बुडाले असून गेल्या ४८ तासांपासून त्यांचा शोध सुरू आहे. अद्याप ते मिळून न आल्याने भीती व्यक्त केली जात आहे. शक्तिमान कुमार आणि सोनू कुमार (दोघांचे वय- २० वर्ष) असं इंद्रायणी नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. ते शनिवारी पोहण्यासाठी गेले होते. परंतु, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू कुमार आणि शक्तिमान कुमार हे दोघेही पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये कामानिमित्त मोशी परिसरात राहण्यास आहेत. शनिवारी दुपारी इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी दोघेजण उतरले तर तिसरा मित्र हा पोहायच नसल्याने परत गेला. दरम्यान, दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बराच वेळ झाला तरी दोघे येत नसल्याने मित्र त्या ठिकाणी आला. त्याला शक्तिमान आणि सोनूचे कपडे नदी काठावर दिसले. त्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफ जवान दोघांचा शोध घेत आहेत. अद्याप दोघेही मिळून आले नाहीत. सोनू आणि शक्तिमान दोघे ही मूळ बिहार राज्यातील आहे. काही महिन्यांपासून ते पिंपरी- चिंचवड शहरात कामानिमित्त आले होते. त्यांचा शोध अद्यापही सुरू आहे.