राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या ‘अभ्यास’ दौऱ्याच्या नावाखाली काढण्यात येणाऱ्या सहलींच्या निषेधार्थ शिवसेनेने बुधवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले, ते राष्ट्रवादीला चांगलेच झोंबले आहे. यापूर्वीच्या अनेक दौऱ्यांमध्ये शिवसेनेचे नगरसेवकही सहभागी झाल्याचे सांगत शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. निवडणुका जवळ आल्या असल्याने राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षड्यंत्र असून शिवसेनेची प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादीने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख यांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक सिक्कीम दौऱ्याला गेले होते. मात्र, तेथील नागरी सुविधा व प्रशासकीय कामांची माहिती करून घेण्याचा हेतू त्यामागे होता. मात्र, शिवसेनेने भांडवल करत त्यात राजकारण आणले आहे. आतापर्यंतच्या अनेक दौऱ्यात शिवसेनेचे नगरसेवक सहभागी होत होते, तेव्हा शिवसेना झोपली होती का, असा मुद्दा राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena defame ncp
First published on: 27-05-2016 at 03:54 IST