छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवजन्मस्थळाची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ.. सरदार, मावळे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ५१ स्वराज्यरथ.. महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींनी मर्दानी खेळांची केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके.. ५१ रणशिंगांची ललकारी.. ढोलताशांचा रणगजर.. सनईचौघडय़ांचे मंगलमय सूर.. पारंपरिक पोशाखातील महिलांचा सहभाग आणि ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष अशा वातावरणात शिवजयंती रविवारी साजरी करण्यात आली.

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्य मिरवणुकीचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, छत्रपती संभाजीराजे, ‘मिस्टर युनिव्हर्स’ संग्राम चौगुले, िरकल अमित गायकवाड तसेच समितीच्या महिला सदस्यांच्या हस्ते लाल महाल येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून झाले. समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, अ‍ॅड. प्रताप परदेशी, पराग मते, प्रवीण परदेशी या वेळी उपस्थित होते.

मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथापाठोपाठ वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक-जेधे, सरदार कृष्णाजी नाईक-बांदल, सरनोबत सेनापती येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक िनवगुणे, जैताजी नाईक-करंजावणे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, सरदार राऊतराव ढमाले, सुभेदार खंडोजी माणकर, सरदार दयाजीराव मारणे, सरदार नावजी बलकवडे, वीरमाता धाराऊ गाडे, सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, िहमतबहाद्दर विठोजी चव्हाण, सरदार लखुजीराजे जाधवराव, सरदार संभाजी काटे, सरदार िनबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती-शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, सरदार संभाजी कोंढाळकर, महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, समशेर बहाद्दर दमाजीराव गायकवाड, महादजी िशदे सरकार या स्वराज्यघराण्यांचे रथ सहभागी झाले होते.

महाराणी ताराराणी शौर्य पथकाचे उद्घाटन प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले. शिवगर्जना ढोलताशा पथकाच्या वादनाने साऱ्यांना मंत्रमुग्ध केले. या पथकाने ‘मतदान करा, उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवा’ अशा फलकांद्वारे मतदान जनजागृती केली. शिवकालीन मर्दानी युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji jayanti 2017 in pune
First published on: 20-02-2017 at 02:23 IST