पुणे : अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे विरोधक शिवाजी आढळराव यांच्या भैरवनाथ पतसंस्था तसेच पीडिसीसी बँकेबाहेर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. नौटंकी ढंगात कोल्हे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. मी कधी पतसंस्थेत राजकारण आणलं नाही. पतसंस्था ही जनतेच्या हितासाठी असल्याचं आढळराव म्हणाले. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शिवाजी आढळराव यांनी अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला. कोल्हे यांनी नुकतच ते मालिका क्षेत्रातून पाच वर्षांसाठी संन्यास घेणार असल्याचे म्हटल आहे. यावरून आढळराव म्हणाले, अमोल कोल्हे यांचा हा चुनाव जुमला आहे. पाच वर्षांपूर्वी देखील असच त्यांनी संन्यास घेणार असल्याचे म्हटले होत. तसा व्हिडिओ शिवाजी आढळराव यांनी दाखवला. त्यामुळे कोल्हे यांच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. हा त्यांचा चुनावी जुमला आहे. असा टोला त्यांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे.

हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारावर ‘पाणी’… वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पुढे ते म्हणाले, अमोल कोल्हे यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे ते दररोज नवीन आरोप करत आहेत. संस्थेबद्दल कोल्हे यांनी तक्रार करावी. प्रशासनाला वाटल्यास ते पोलीस बंदोबस्त वाढवतील. अस ही त्यांनी नमूद केलं.